कान्स्
कान्स्: चिनी गान्सू, वायव्य चीनमधील एक प्रांत, क्षेत्रफळ ३,६६,५००चौ. किमी.; लोकसंख्या१,३०,००,०० (१९६८ अंदाज). पूर्वेस शानसी, ईशान्येस इनर मंगोलिया, वायव्येस सिंक्यांग उइघर स्वायत्त विभाग व पश्र्चिमेस चिंगहाई प्रांत आहेत. लानजो या राजधानी व्यतिरिक्त यिनच्यान व वूचुंग ही प्रांतातील प्रमुख शहरे होत.